Join us

येऊ कशी तशी मी नांदायला: अखेर स्वीटू आणि ओम अडकले लग्नबेडीत, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 07:00 IST

Yeu Kashi Tashi Mi Nandayala : येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचलेली पाहायला मिळते आहे. या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतेच मालिकेत मालविका आणि मोहितचे कारस्थान सर्वांसमोर आले आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. तर तिथेच मोहितने स्वीटूला घटस्फोटदेखील दिलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान एकीकडे स्वीटू आणि ओम आता लग्न करतील का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला असतात त्या दोघांच्या लग्नांचे फोटो समोर आले आहेत. 

अजून ओम आणि स्वीटूची प्रेमकहाणी पूर्णत्वास येण्यास जरा वेळ आहे मात्र ही लव्हस्टोरी पुढे जाण्याआधीच आज ओम आणि स्वीटूच्या लग्नाची शूटिंग पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. ओम सध्या स्वीटूला आपलंसे करायला गावी जाणार आहे. एका प्रोमोमध्ये ओम स्वीटूला भेटायला गावी जात आहे तिथेच या दोघांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. यानंतर ओम आणि स्वीटू लवकरच लग्न देखील करताना दिसणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडमध्ये ओम आणि स्वीटूच्या लग्नाचे शूटिंग आज पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या भागाची उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत अचानक आलेला हा ट्विस्ट गोंधळून टाकणारा जरी असला तरी या क्षणाची प्रेक्षकांनी आतुरतेने वाट पाहिली आहे. ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाचा सोहळा मालिकेच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यांच्या लग्नात मालविका देखील उपस्थित असणार आहे. हे सर्व आनंदाचे क्षण परत मिळवल्यानंतर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.