Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील मोहित खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, त्याची पत्नी आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 06:00 IST

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मालविकाला कट कारस्थानात मदत करणाऱ्या मोहितच्या भूमिकेतून अभिनेता निखिल राऊत घराघरात पोहचला.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका येऊ कशी तशी मी नांदायलाने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत मालविकाला कट कारस्थानात मदत करणारा मोहित घराघरात पोहचला. ही भूमिका साकारतो आहे अभिनेता निखिल राऊत.निखिल राऊतने आतापर्यंत बऱ्याच मालिकेत काम केले आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. 

अभिनेता निखिल राऊत एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मला असल्यामुळे त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. मात्र काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेली आणि त्यातच त्याच्या कुटुंबाला आर्थिक अ़डचणीला सामोरे जावे लागले.

घरखर्चाला हातभार लावावा म्हणून वडिलांनी घेऊन दिलेल्या सायकलवरून घरोघरी जाऊन दूध वाटप करण्याचे ठरवले. बालपणापासून त्याला अभिनयाचे वेड होते. त्याला ही आवड जोपासण्यासाठी त्याच्या आईकडून पाठिंबा मिळाला. आज मी जो काही आहे ती आईमुळेच असे तो आवर्जुन सांगतो. 

गेल्या सतरा ते अठरा वर्षांपासून तो अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने काहें दिया परदेस, तू तिथे मी, फर्जंद, फत्तेशीकस्त, वळू, शेवग्याच्या शेंगा, चॅलेंज अशा विविध मालिका ,चित्रपट तसेच नाटकात त्याने काम केले.

निखिल अभिनयासोबतच उत्तम कुक देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच आपल्या रेसिपी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. 

२२ एप्रिल २०१४ साली निखिलने मयुरी सोबत विवाह केला. मयुरी एक क्लासिकल डान्सर असून ग्लॉडीयस इव्हेंट्स अँड वेडिंग येथे वेडिंग प्लॅनर म्हणून कार्यरत आहे. 

टॅग्स :निखिल राऊतझी मराठी