Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील मोहितची पत्नी आहे खूप सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 07:00 IST

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मोहितच्या निगेटिव्ह भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील ओम, स्वीटूची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते आहे. तसेच या मालिकेत निगेटिव्ह पात्र मालविका आणि मोहितच्या कामाचीदेखील प्रशंसा होताना दिसत आहे. मोहितची भूमिका साकारली आहे अभिनेता निखिल राऊतने. निखिलने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.

अभिनेता निखिल राऊतने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. निखिलचा अभिनय जेवढा उत्तम आहे त्यामागे त्याने तेवढी मेहनतही घेतली आहे. निखिलच्या घरची परिस्थिती ही बेताची होती.

काही कारणास्तव निखिलच्या वडिलांची नोकरी गेली आणि घरात पैशांची अडचण भासू लागली. घरखर्चात मदत व्हावी म्हणून वडिलांनी दिलेल्या सायकलवर जाऊन तो दूध विकत असे.

तेव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे आणि यामध्ये त्याला त्याच्या आईने पाठिंबा दिला. त्यामुळे आता तो जो काही आहे त्यामागे त्याच्या आईचा हात आहे असे तो आवर्जून सांगतो. गेली सतरा-अठरा वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

अभिनयाबरोबरच त्याला जेवण बनवायचीही आवड आहे आणि तो अनेक पोस्टही शेअर करत असतो. २२ एप्रिल २०१४ मध्ये निखिलने मयुरीबरोबर लग्न केले.

ती एक क्लासिकल डान्सर आहे आणि वेडिंग प्लानर सुद्धा आहे. मयुरी ही दिसायलाही खूप सुंदर आहे. निखिल आणि मयुरीची यांची जोडी साजेशी आहे. 

टॅग्स :निखिल राऊत