Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजून एक संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 17:53 IST

कलश-एक विश्वास या मालिकेतील अपर्णा दीक्षित आणि पुरू छिब्बर गेल्या काही महिन्यांपासून नात्यात असल्याची चर्चा आहे. पण काही दिवसांपासून ...

कलश-एक विश्वास या मालिकेतील अपर्णा दीक्षित आणि पुरू छिब्बर गेल्या काही महिन्यांपासून नात्यात असल्याची चर्चा आहे. पण काही दिवसांपासून त्यांच्यात काही खटके उडत असल्याने त्यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला असल्याचे म्हटले जात होते. पण त्यांनी त्यांच्या नात्याला अजून एक संधी देण्याचे ठरवले आहे अशी चर्चा आहे पण असे काहीही नसल्याचे अपर्णाचे म्हणणे आहे. ती सध्या सिंगल असून तिने सगळे निर्णय देवावर टाकले असल्याचे तिचे म्हणणे आहे. कोणत्याही नात्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ हा लागतो. ती सध्या तिच्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवत आहे. तर पुरू सांगतो, "मी आणि अपर्णा आम्ही दोघे अडीज वर्षं एकमेकांना ओळखत असून आज ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहे. तिचे माझ्या कुटुंबियांसोबतही खूप चांगले नाते आहे. आमच्या दोघांचे पालक एकमेकांना भेटल्यावरच या विषयावर बोलायचे असे आम्ही ठरवले आहे."