Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांच्या वडिलांवर जडला होता प्रसिद्ध अभिनेत्रीचा जीव, कुटुंबाच्या विरोधात जाऊन केलं लग्न अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 08:10 IST

अभिनेत्याला पहिल्या लग्नापासून दोन मुली असल्याने अभिनेत्रीच्या घराच्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता.

तुम्हाला अभिनेत्री रक्षंदा खान आठवते का? 'जस्सी जैसी कोई नहीं', 'क्योंकी सास भी कभी बहू थी' आणि 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या डझनभर टीव्ही मालिकांमधून रक्षंदाने आपली छाप पाडली होती. एकेकाळी तिची गणना टीव्हीच्या सुपरहिट अभिनेत्रींमध्ये व्हायची. सध्या रक्षंदा खान 'जनम जनम का साथ' या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. आज रक्षदा तिचा वाढदिवस साजरा करते आहे त्यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी. 

रक्षंदा खानने 15 मार्च 2014 रोजी तिचा बॉयफ्रेंड सचिन त्यागीसोबत लग्न केले. या कपलला इनाया त्यागी नावाची मुलगी देखील आहे. रक्षंदा खान आणि सचिन त्यागी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघेही अनेकदा एकमेकांवरीव प्रेम व्यक्त करत असतात.  या टीव्ही कपलची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. 

सचिन त्यागी हे टेलिव्हिजन जगतात रामायण, थोडा सी जमीन थोडा आसमान, कुछ अपने कुछ पाराय यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सचिन त्यागी हा खूप चांगला गायक देखील आहे. एका शोच्या रिहर्सल दरम्यान सचिन आणि रक्षंदाची भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली.

सचिन त्यागी उत्तर प्रदेशातील हिंदू कुटुंबातील असून रक्षंदा खान मुंबईतील मुस्लिम कुटुंबातील आहे. दोघांचे धर्म वेगळे असल्याने कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. एवढेच नाही तर रक्षंदा खान आणि सचिन त्यागी यांच्या कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले होते की, हे लग्न होऊ शकत नाही. रक्षंदासोबत लग्न करण्यापूर्वी सचिन त्यागीचे लग्न झाले होते आणि त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले होती.

सचिन त्यागीच्या आधी रक्षंदा खान बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि निर्माता साजिद खानसोबत दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये  होती. दोघांनी 10 वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केले पण नंतर रक्षंदा आणि साजिद वेगळे झाले. यानंतर रक्षंदाच्या आयुष्यात सचिनची एंट्री झाली. आज दोघे सुखाने संसार करतायेत. 

टॅग्स :टिव्ही कलाकार