Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ये है मोहब्बतें'मधली रूही झाली ग्रॅज्युएट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली - "स्वप्नांपासून वास्तवाकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:11 IST

Ruhanika Dhawan Graduates: 'ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्री रुहानिका शर्माने तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या शाळेच्या दीक्षांत समारंभाचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

'ये है मोहब्बतें' (Yeh Hai Mohabbatein) या मालिकेत रुहीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेल्या रुहानिका धवन(Ruhanika Dhawa)ने आयुष्यातील एक महत्त्वाचा पल्ला पार केला  आहे. तिने तिच्या गोंडस चेहऱ्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. आता रुहानिका १७ वर्षांची आहे आणि तिने नुकतेच तिचे हायस्कूल ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. रुहानिका धवनने तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सिनेइंडस्ट्रीतून ३ वर्षांचा ब्रेक घेतला. या वर्षी आयबी बोर्डाच्या १२ वीच्या वर्गात या अभिनेत्रीने ९१% गुण मिळवले आहेत. 

अलिकडेच, रुहानिका धवनच्या शाळेत एक दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये तिचे पालकही उपस्थित होते. यावेळी, त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटत होता. रुहानिकाने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसह तिच्या दीक्षांत समारंभाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओसह अभिनेत्रीने लिहिले की, '२०२५ च्या वर्गातून अधिकृतपणे पदवीधर होत आहे, भविष्य उज्ज्वल आहे आणि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों!'

आजची ग्रॅज्युएशन सेरेमनी ही एक...दुसऱ्या व्हिडीओसह, अभिनेत्रीने लिहिले की, 'स्वप्नांपासून वास्तवाकडे, आजचा पदवीदान समारंभ हा एक अतिशय अर्थपूर्ण अनुभव होता, वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रम, विकास आणि संस्मरणीय क्षणांचा जिवंत शेवट होता. त्या टप्प्यावरून चालताना, माझे मन शाळेबद्दल अपार कृतज्ञतेने भरून आले ज्यांनी मला येथे पोहोचण्यास मदत केली. माझ्या शिक्षकांचे, नवीन कल्पनांसाठी आम्हाला चालना देण्यासाठी, तुमच्या संयमाबद्दल आणि तुमचे ज्ञान इतक्या मोकळेपणाने सामायिक केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आम्हाला केवळ विषय शिकवला नाही तर जीवनाचे अमूल्य धडे देखील दिले जे मी नेहमीच माझ्यासोबत ठेवेन.'

रुहानिकाने शेवटी लिहिले, 'माझ्या अप्रतिम पालकांचे आभार शब्दात व्यक्त करता येत नाहीत. तुमचे प्रोत्साहन, तुमच्या असंख्य दयाळूपणाचे कृत्य आणि तुमचा अढळ पाठिंबा हा माझ्या प्रवासाचा पाया आहे, तुम्ही मला चिकाटी आणि मोठे स्वप्न पाहण्याचे मूल्य शिकवले आहे. ही कामगिरी एक सामायिक कामगिरी आहे आणि मी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच आभारी आहे. कृतज्ञतेने प्रेरित नवीन साहसांना शुभेच्छा.'

'ये है मोहब्बतें'मधून रुहानिकाला मिळाली ओळख'ये है मोहब्बतें' या मालिकेतून रुहानिकाला खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती 'मेरी आशिकी तुमसे ही', 'गुलाम', 'कसम तेरे प्यार की' आणि 'कुंडली भाग्य' सारख्या मालिकांमध्येही दिसली आहे.