Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेलिव्हिजनवरील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 13:07 IST

पाच वर्षे डेट केल्यानंतर आता हा अभिनेता लग्नबेडीत अडकणार आहे.

टेलिव्हिजनवरील क्वीन एकता कपूरची लोकप्रिय मालिका 'ये है मोहब्बते'मध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्याचे नाव आहे अनुराग शर्मा. अनुराग शर्मा गेल्या पाच वर्षांपासून नंदिनी गुप्ताला डेट करतो आहे. नंदिनीसोबत अनुराग या महिन्याच्या अखेरिस म्हणजे ३१ जानेवारीला सात फेरे घेणार आहे. हा खुलासा खुद्द त्यानेच सोशल मीडियावर केला आहे.

अनुरागने 'ये है मोहब्बते' मालिकेत परम खुराना ही भूमिका साकारली होती. त्याने निगेटिव्ह भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. अनुरागने आता त्याच्या लग्नाबद्दल इंस्टाग्रामवर सांगितले आहे.

त्याने लिहिले की,'किस्मत कनेक्शन. पहिल्यांदा नंदिनीला पाहताच मला तिच्यावर प्रेम झाले होते. मी व नंदिनी लग्न करत आहोत. या कुटुंबात माझा समावेश झाल्यामुळे स्वतःला धन्य मानतो. आशा करतो की मित्र व चाहत्यांचे असेच प्रेम मिळत राहिल.' त्याच्या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अनुरागने इंस्टाग्रामवर नंदिनीसोबतचे बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्या दोघांची खूप छान केमिस्ट्री पहायला मिळत आहे. 

अनुरागने त्याच्या करियरची सुरूवात २००९ साली एकता कपूरची मालिका 'पवित्र रिश्ता'मधून केली होती.

या मालिकेत त्याने सतीश देशपांडेची भूमिका साकारली होती.

त्यानंतर त्याने 'तेरे लिए', 'ब्याह हमारी बहू का', 'अदालत', 'जोधा अकबर', 'ये है आशिकी', 'कुमकुम भाग्य', 'अजीब दास्तां है ये', 'इतना करो न मुझे प्यार', 'कवच काली शक्तियों से' व 'उडान' या मालिकेत काम केले आहे.

टॅग्स :एकता कपूरये है मोहब्बतें