Television: गेल्या काही वर्षांमध्ये छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक आणि वेगवेगळ्या विषयांवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकांना प्रेक्षकांचाही तितकाच उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यापैकीच एक मालिका म्हणजे शुभविवाह. अभिनेता यशोमन आपटे आणि मधुरा देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिकेने जवळपास ३ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मालिकेत आकाश आणि भुमीचे पात्र साकारून या जोडीने रसिकांच्या मनावर गारुड घातलं. नुकतेच या मालिकेने १००० हजार भागांचा टप्पा गाठला.अशातच या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, शुभविवाह या मालिक १३ एप्रिल २०२३ रोजी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेचं कथानक, कलाकारांच्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेने जवळपास तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ‘शुभविवाह’ मालिका अचानक ऑफ एअर झाल्याचं म्हटलं जातं आहे. काल १ मार्चला या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करण्याच आला आहे. मात्र, याबाबत वाहिनीने किंवा कलाकारांनी कोणतीही अपडेट दिलेली नाही.
शुभविवाह मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जायची.असं असूनही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या दहामध्ये असायची. परंतु, शुभविवाह मालिका निरोप घेणार, याच्या अंतिम भागाचा प्रोमो अशी कोणतीही अपडेट स्टार प्रवाह वाहिनीकडून शेअर करण्यात आलेली नाही.त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत.
Web Summary : The popular Marathi television series 'Shubh Vivah,' starring Yashoman Apte and Madhura Deshpande, has abruptly ended its three-year run, leaving viewers surprised. The show, which premiered on April 13, 2023, and recently celebrated 1000 episodes, aired its final episode on March 1st without prior notice from the channel.
Web Summary : यशोमन आपटे और मधुरा देशपांडे अभिनीत लोकप्रिय मराठी टेलीविजन श्रृंखला 'शुभ विवाह' का तीन साल का सफर अचानक समाप्त हो गया, जिससे दर्शक हैरान हैं। यह शो, जिसका प्रीमियर 13 अप्रैल, 2023 को हुआ था और हाल ही में 1000 एपिसोड पूरे हुए, ने चैनल से पूर्व सूचना के बिना 1 मार्च को अपना अंतिम एपिसोड प्रसारित किया।