Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवखळ अल्लड बयोचा सुरु होतोय 'श्यामची आई' होण्याचा प्रवास; 'या' दिवशी रंगणार विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 17:06 IST

प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार आहे.

 'यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची'ही मालिका आज एक नवीन वळण घेणार आहे. अवखळ अल्लड तसेच अतिशय धीट असलेल्या बयोच्या आयुष्यात नवीन घटना घडणार आहे ती म्हणजे बयोचा लवकरच सदाशिवरावांबरोबर विवाह होणार आहे.

प्रेक्षकांची लाडकी बयो आता यशोदा सदाशिवराव साने होणार आहे. बयोचा आता नवीन जन्म होणार आहे. सदाशिवराव साने यांच्याबरोबर सहचारिणी म्हणून यशोदेचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. बयोचा वैशाख कृष्ण द्वितीयेला विवाह सोहळा संपन्न होणार आहे. 

'यशोदा- गोष्ट श्यामच्या आईची' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. ' या मालिकेत लवकरच यशोदा आणि सदाशिवराव साने यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. हा विवाह विशेष भाग प्रेक्षकांना 16 मे 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. 

ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती, पण मालिकेची दुपारची ही वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे फोन कॉल्स आणि इ मेल्स वाहिनीकडे आले. त्यामुळे प्रेक्षकांचा आदर राखत निर्मात्यांनी या मालिकेची वेळ बदलली आहे.  

टॅग्स :झी मराठी