Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावर 'यारों की बारात' !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 14:52 IST

छोट्या पडद्यावर लवकरच नवा आगळावेगळा टॉक शो रसिकांच्या भेटीला येणार आहे. यारों की बारात असं या शोचं नाव असेल. ...

छोट्या पडद्यावर लवकरच नवा आगळावेगळा टॉक शो रसिकांच्या भेटीला येणार आहे. यारों की बारात असं या शोचं नाव असेल. लयभारी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा बॉलीवुडमधील खास मित्र साजिद खान हा शो होस्ट करणार आहे. दहा आठवडे हा शो चालणार आहे. या शोमध्ये बॉलीवुडच्या प्रसिद्ध मित्र-मैत्रिणींच्या जोड्या एकत्र पाहायला मिळतील. यावेळी या मित्र-मैत्रिणींना विविध टास्क, आव्हानं दिली जाणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि शॉटगन शत्रुघ्न सिन्हा या नव्या शोची ओपनिंग जोडी असणार असल्याचं समजतंय. याशिवाय परिणिती चोप्रा-सानिया मिर्झा, करण जोहर-फराह खान पाहायला मिळणार आहेत.