Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र चित्रीकरण करताना 'यह रिश्ता…'चे जुने कलाकार रमले आठवणींमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 18:46 IST

'यह रिश्ता क्या कहलाता है!' मालिकेतील कार्तिक आणि नायरा यांनी आयोजित केलेल्या 'रिश्तों का उत्सव' कार्यक्रमात या मालिकेतील काही जुने कलाकार सहभागी झाले होते.

ठळक मुद्दे'रिश्तों का उत्सव' कार्यक्रमात सहभागी झाले काही जुने कलाकार

स्टार प्लस वाहिनीवरील 'यह रिश्ता क्या कहलाता है!' मालिकेतील कार्तिक आणि नायरा यांनी आयोजित केलेल्या 'रिश्तों का उत्सव' कार्यक्रमात या मालिकेतील काही जुने कलाकार सहभागी झाले होते. या जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा या मालिकेतील काही कलाकारांबरोबर एकत्र संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे ते खूपच आनंदित झाले होते आणि तेव्हा ते जुन्या आठवणींमध्ये रमून गेले.

या मालिकेतील सर्वात मोठ्या कौटुंबिक पुनर्भेटीसाठी अमरदीप झा, संजीव सेठ, विनिता मलिक वगैरे तब्बल ४० जुने कलाकार एकत्र येणार आहेत. मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता मोहसिन खान म्हणाला,' हा सर्वात भव्य कौटुंबिक पुनर्भेटीचा उत्सव असून त्यात या कुटुंबाच्या सर्व पिढ्यांतील कलाकार एकाच छताखाली एकत्र आल्याचे पाहून मन आनंदाश्चर्याने भरून गेले. यावेळी आलेले सर्व जुने कलाकार गतस्मृतींमध्ये रममाण झाले होते. त्यावेळच्या चित्रीकरणाच्या आठवणी निघत होत्या आणि इतक्या वर्षांनी पुन्हा या मालिकेत सहभागी होण्याचा आनंदही त्यांच्याचेहऱ्यावर दिसून येत होता. या जुन्या मंडळींना एकत्र आणून आम्ही या मालिकेतीलच नव्हे, तर कलाकारांमधील नातेसंबंध अधिक मजबूत करीत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत असून त्यांच्याबरोबर गप्पा मारण्याचा अनुभव वेगळाच होता.'स्टार प्लसवरील 'यह रिश्ता क्या कहलाता है!' मालिकेतील रिश्तों का उत्सव कार्यक्रमासाठी या मालिकेतील काही जुने कलाकार सहभागी होत असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी तसेच मालिकेच्या प्रेक्षकांसाठी हा भाग वेगळाच आनंद देऊन जाईल.

टॅग्स :स्टार प्लस