क्योंकी साँस भी कभी बहू थी सोडणं हा चुकीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 11:58 IST
क्योंकी साँस भी कभी बहू थी या कार्यक्रमामुळे अभिनेता अमर उपाध्याय याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पण नंतरच्या काळात ...
क्योंकी साँस भी कभी बहू थी सोडणं हा चुकीचा निर्णय
क्योंकी साँस भी कभी बहू थी या कार्यक्रमामुळे अभिनेता अमर उपाध्याय याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. पण नंतरच्या काळात त्याला ती तितकीशी टिकवता आली नाही.तो सध्या स्टार प्लस वाहिनीवरील साथ निभाना साथिया या कार्यक्रमात काम करत आहे. क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका सोडणे हा अतिशय चुकीचा निर्णय असल्याचे त्याचे म्हणणे आहे. पण चुका या माणसाकडूनच होतात.त्यावेळी मालिका सोडणे हे त्याला योग्य वाटले होते. पण त्याचा निर्णय चुकला असे त्याचे म्हणणे आहे. मोठे स्टार्सही फ्लॉप चित्रपट देतात, आयुष्यात उतारचढाव हे येतच असतात असे त्याचे म्हणणे आहे. पण सध्या प्रेक्षक त्याची भूमिका पसंत करत असल्याचा त्याला आनंद आहे.