Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहितने पटकवला मिस्टर वर्ल्डचा किताब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 12:53 IST

ये है अाशिकी, प्यार तूने क्या किया यांसारख्या मालिकेत झळकलेला अभिनेता रोहित खंडेलवाल याने मिस्टर वर्ल्ड 2016 चा किताब ...

ये है अाशिकी, प्यार तूने क्या किया यांसारख्या मालिकेत झळकलेला अभिनेता रोहित खंडेलवाल याने मिस्टर वर्ल्ड 2016 चा किताब मिळवला आहे. हैद्राबादमध्ये राहाणाऱ्या रोहितने एका जाहिरातीद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याची पहिलीच जाहिरात करिना कपूरसोबत होती. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले. रोहित हा मिस्टर वर्ल्ड हा किताब मिळवणारा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी कोणत्याही आशिया खंडातील माणसाने हा किताब मिळवला नव्हता. रोहितला 50 हजार डॉलर इतकी मोठी रक्कम बक्षिस म्हणून मिळालेली आहे. रोहितने या स्पर्धेच्यावेळी प्रसिद्ध डिझायनर निवेदिता साबूने डिझाईन केलेले कपडे घातले होते.