Join us

​कुस्तीपट्टू वसंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 16:37 IST

बडे दूर से आये है या मालिकेत प्रेक्षकांना आता कुस्ती पाहायला मिळणार आहे. मखन हा आपल्या मुलाचा मुलगा असल्याने ...

बडे दूर से आये है या मालिकेत प्रेक्षकांना आता कुस्ती पाहायला मिळणार आहे. मखन हा आपल्या मुलाचा मुलगा असल्याने त्याचा सांभाळ करण्याची संधी आपल्याला मिळावी असे वसंत घोटालाचे म्हणणे आहे. पण काहीही करून दौलत राम त्याला आपल्याकडेच ठेवायचे असे म्हणत आहे. आता दौलत राम वसंत घोटालाला एक आव्हान देणार आहे. कुस्तीमध्ये वसंतने त्याला हरवल्यास मखनचा ताबा घोटाला कुटुंबाकडे द्यायला तो तयार असल्याचे तो वसंतला सांगणार आहे. दौलतने त्याला कुस्ती येत नसल्याचे घोटाला कुटुंबाला सांगितले आहे. पण खरे तर तो एक खूपच चांगला कुस्तीपटू आहे. तर दुसरीकडे वसंतला आता त्याच्या घरातील लोक कुस्तीचे धडे देणार आहेत.