Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाडू आणि तारामध्ये रंगणार कुस्तीचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 09:07 IST

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

ठळक मुद्देछोटा पैलवान लाडूने गाजवला कुस्तीचा आखाडा लाडू व तारामध्ये रंगणार कुस्तीचा डाव

झी मराठीवरीलतुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की एकीकडे राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे तर दुसरीकडे छोटा पैलवान लाडूने कुस्तीचा आखाडा गाजवला. लाडू कुस्ती जिंकून अख्ख्या गावाची शान वाढवतो. स्वतः प्रतापराव लाडूच्या सत्कार समारंभाला हजर राहतात. त्याच्या पहिल्या कुस्तीच्या विजयानंतर शेजारील गावातील एक इसम लाडूसाठी अजून एका कुस्तीचे आव्हान घेऊन येतो, पण यावेळी ही कुस्ती तारा नावाच्या मुलीसोबत असणार आहे. नाना यांची मुलगी तारा ही देखील एक कुस्तीपटू असून नाना तिच्या तोडीच्या कुस्तीपटूसोबत तिच्या सामना करायचा ठरवतात आणि लाड़ूशिवाय तिला कोणी टक्कर देऊ शकत नाही असे नानांना वाटते. एका मुलीसोबत कुस्ती करणार म्हणून लाडू गावात चर्चेचा विषय ठरला आहे. लाडू एक सच्चा पेहलवान नाही असे देखील काही लोक बोलत आहे. आता अंजली लाडूला या कुस्तीसाठी कसे तयार करणार आणि लाडू व तारामधील कुस्तीचा डाव छोट्या पडद्यावर पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठी