Join us
Daily Top 2Weekly Top 5

Nach Baliye 9 : टीव्हीवरील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने रिएलिटी शोमध्ये चक्क दुस-यांदा केले लग्न, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 06:00 IST

Nach Baliye 9 : अनिताने 'ये है मोहोब्बते' या मालिकेत साकारलेल्या तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची 'नागीन ३' मालिकेतील भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

छोट्या पडद्यावरील रोमँटीक कपल अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांनी नच बलियेच्या सेटवर पुन्हा लग्न केल्याचे फोटो समोर आले आहेत. रोहित हा एक व्यावसायिक आहे. रोहित आणि अनिता यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची ओळख जिम मध्ये झाली होती. या आधी त्याने एका पबमध्ये अनिताला पहिले होते. पण त्यावेळी तिच्याशी बोलण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्यानंतर फेसबुकद्वारे त्याने तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली. ती एक अभिनेत्री असल्याचे त्यावेळी त्याला माहीतच नव्हते. काहीच महिन्यात त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गेली 10 वर्षे एकमेकांच्या डेट केल्यानंतर  2013 साली रोहित रेड्डीसह अनिताने लग्न केले होते.

आता आपल्या नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी  टीव्हीवर अनिताशी पुन्हा एकदा विवाहबध्द होण्याचा निर्णय रोहितने घेतला.अनिताला अनपेक्षित आनंदाचा धक्का देण्यासाठी त्याने नच बलियेच्या सेटला फुले आणि फुग्यांनी सजवले होते.इतकेच नाही तर यावेळी  रोहितने गुडघ्यावर बसून हि-याची अंगठी देत तिला प्रपोजही केले.

 

तसेच अनिताला खास सरप्राईज देण्यासाठी चक्क लग्नाचाच घाट पती रोहितने घातल्याचे पाहून ''आज मै ऊपर आसमां निचे अशीच तिची अवस्था'' झाली असणार हे मात्र नक्की. ऑनस्क्रीन होणा-या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी रोहितने अनिताच्या पालकांना तसेच तिचे खास मित्र असलेल्या करण पटेल आणि आदिती भाटिया यांनाही मंचावर आमंत्रित केले होते. हे रोमँटीक  फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.

अनिताने 'ये है मोहोब्बते' या मालिकेत साकारलेल्या तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची 'नागीन ३' मालिकेतील भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. रोहितच्या आधी अनिता काव्यांजली मालिकेतील तिचा सहकलाकार एजाज खान सोबत नात्यात होती. त्यांचे अफेअर जवळजवळ सहा वर्ष सुरु होते.    

टॅग्स :नच बलियेअनिता हसनंदानी