दया आशाला स्वीकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 11:28 IST
बरखा बिष्ट,विराफ पटेल, रिमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नामकरण या मालिकेत प्रेक्षकांना एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...
दया आशाला स्वीकारणार?
बरखा बिष्ट,विराफ पटेल, रिमा लागू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नामकरण या मालिकेत प्रेक्षकांना एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आशिषने आपल्याला एक मुलगी आणि पत्नी असल्याचे नेहमीच आपल्या आईपासून लपवून ठेवले आहे. पण पुढील काही भागांमध्ये आशिषच्या आईला म्हणजेच दयाला ही गोष्ट कळणार आहे. आशाने आशिषसाठी लिहिलेले पत्र तिच्या हातात पडणार आहे. त्यानंतर दया आशाला भेटून खरे काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. पण आशाला भेटल्यावर आशिषचे हे दुसरे जग पाहून तिला धक्काच बसणार आहे आणि त्यात आशाच्या घरी गेल्यावर तिला मुलगी असल्याचेही दयाला कळणार आहे. यानंतर दया आशाला आणि अवनीला स्वीकारते का हे पाहाणे नक्कीच इंटरेस्टिंग असेल.