Join us

काम्याने मागितली सोशल मीडियावर दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:24 IST

डोली अरमानो की ही मालिका संपून जवळजवळ ८-१० महिने झाले आहेत. पण आजही या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना त्यांचे ...

डोली अरमानो की ही मालिका संपून जवळजवळ ८-१० महिने झाले आहेत. पण आजही या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. अनेकवेळा प्रयत्न करूनही काहीही दाद मिळत नसल्याने अभिनेत्री काम्या पंजाबीने सोशल मीडियावर आपली समस्या मांडली आहे. तिने या मालिकेची निर्माती पर्ल ग्रेला उद्देशून फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे आणि यात म्हटले आहे की, कमेंट डिलिट करून अथवा मला ब्ल़ॉक करून काहीही फरक पडणार नाहीये. पर्ल तुम्ही मालिका संपल्यावर लगेचच परदेशी निघून गेलात, तुम्ही तुमचे वाढदिवस, नवीन वर्ष सगळे काही मोठ्या उत्साहात साजरे केले. पण तुम्हाला तुमच्या मालिकेत काम केलेल्या लोकांना पैसे द्यायला पैसे नाहीत. मी माझ्या मुलीला घरी ठेवून कित्येक तास चित्रीकरण करत होती. तुम्हीच सांगा मी मेहनत नाही केली का, तुम्हाला आमचे पैसे द्यावेच लागणार आहेत. कामियाने ही पोस्ट टाकण्याआधी पर्लची बहिण रश्मीशीही पैशांच्या संदर्भात संवाद साधला होता. पण त्यातून काहीही मार्ग न निघाल्याने कामियाने सोशल मीडियावर दाद मागण्याचे ठरवले आहे.