‘स्वरा’ला सारं काही आठवणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 17:05 IST
स्वरागिनीच्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज. रसिकांच्या लाडक्या स्वरा(हेली शाह)ची स्मृती पुन्हा एकदा परतणार आहे. गेल्या दिवसांपासून स्मृतीभ्रंश झालेल्या स्वराला सारं ...
‘स्वरा’ला सारं काही आठवणार ?
स्वरागिनीच्या फॅन्ससाठी एक गुडन्यूज. रसिकांच्या लाडक्या स्वरा(हेली शाह)ची स्मृती पुन्हा एकदा परतणार आहे. गेल्या दिवसांपासून स्मृतीभ्रंश झालेल्या स्वराला सारं काही पुन्हा आठवणार आहे.इतकंच नाही तर स्वरा आपल्या लाडक्या प्रेमाकडे म्हणजेच पती संस्कारकडेही परतणार आहे.स्वरागिनीच्या येत्या काही भागात ब-याच गोष्टींचा उलगडा होणार आहे.रॉकस्टार किशन बनलेला संस्कार सारं काही स्वरापुढं कबूल करणार आहे. संस्कारचं हे खोटं रुप पाहून स्वरा त्याच्यावर संतापते. त्याचवेळी साहिल (अनुज सचदेव) हा सुद्धा स्वरापुढं आपल्या प्रेमाची कबूली देते. त्यामुळं स्वरापुढं मोठा पेच उभा राहतो. संस्कार आपल्या पत्नीचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असताना साहिलसुद्धा स्वराबद्दल असलेलं आकर्षण लपवू शकत नाही. तो संस्कारवर बंदूक रोखतो आणि त्याचवेळी स्वराला सारं काही आठवतं. त्यामुळं स्वरागिनीच्या फॅन्सना मालिकेत बरेच ट्विस्ट एंड टर्न अनुभवायला मिळणार आहेत.