Join us

'तू आशिकी'मधील अहान आणि पंक्तीमध्ये फूट पडणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 09:48 IST

अहान आणि पंक्ती आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरूवात करत असतानाच त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी क्रिस्नन बरेटोची एंट्री होणार आहे.

ठळक मुद्देरंगोली रायची भूमिका क्रिस्नन  लवकरच स्क्रीनवर साकारताना दिसणार आहे

कलर्स ची म्युझिकल लव्ह स्टोरी असलेल्या तू आशिकी ने एका क्रांतिकारी लव्ह स्टोरी म्हणून लोकांची मने जिंकली आहेत. या शोने नुकतेच एक वळण घेतले असून यामध्ये जेडीला (राहील आझम)  त्याच्या अहान (ऋत्विक अरोरा), पंक्ती (जन्नत झुबैर खान) आणि शितलच्या (हिमांशी चौधरी)  विरोधात त्याने वाईट कृत्यांमुळे अटक झाली आहे. आणि अहान आणि पंक्ती आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरूवात करत असतानाच त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी क्रिस्नन बरेटोची एंट्री होणार आहे.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना क्रिस्नन बरेटो म्हणते ‘’ तु आशिकीने प्रेक्षकांची मने जिंकली तर आहेतच पण त्याचबरोबर एक निखळ लव्ह स्टोरी आहे, या मालिकाचे भाग होणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. रंगोली रायची भूमिका मी लवकरच स्क्रीनवर साकारताना दिसणार आहे. स्वभावाने दुराग्रही असलेली ही भूमिका म्हणजे तिला हवे ते प्राप्त करण्यासाठी ती काहीही करणारी आहे. एक नकारात्मक भूमिका करणे म्हणजे आव्हानात्मक असते आणि आपल्यातील आणखी एक बाजू दर्शवण्याची एक चांगली संधी मला मिळाली आहे. मला अशी खात्री आहे की लोकांना ही भूमिका मला नक्कीच आवडेल.’’

आता येत्या भागात रंगोलीचे अहान बरोबरच वाढते बंध पाहता पंक्तीचा जळफळाट होणार आहे आणि तिला प्रेमात पडल्याची भावना निर्माण होईल. आता प्रेमाचा हा त्रिकोण पाहणे नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. मग अहान आता पंक्ती की रंगोली कोणाची निवड करेल. ?