Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मध्ये येणार मोठा ट्विस्ट, सौंदर्याचं कारस्थान येणार का कार्तिकसमोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:11 IST

‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. सौंदर्याचे कारस्थान कार्तिक समोर येणार आहे. हा महाएपिसोड २० सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ७ वाजता पहायला मिळणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत काळ्या रंगाचा द्वेष करणारी सौंदर्या दीपाचाही तिरस्कार करते. कार्तिकचं दीपावर प्रेम आहे हे कळल्यापासून ते दोघे कसे एकत्र येणार नाहीत याची सौंदर्याने पुरेपुर काळजी घेतली. कार्तिकच्या मनाचा जराही विचार न करता ऐन लग्नातही सौंदर्याने कारस्थान रचत कार्तिकचं लग्न दीपाऐवजी श्वेताशी करण्याचा डाव रचला. अर्थात लावण्यामुळे सौंदर्याचा हा डाव उधळला गेला आणि सौंदर्याच्या घरात दीपाने सून म्हणून पाऊल ठेवलं. पण सौंदर्याचं सूडचक्र इथेही थांबलं नाही. 

दीपा-कार्तिकला एकमेकांपासून दूर ठेवण्याचे तिचे प्रयत्न अखंड सुरु आहेत. दीपासमोर सौंदर्याचं खरं रुप समोर आलंच आहे. आता वेळ आलीय ती कार्तिकसमोर हे सत्य उघड होण्याची. कार्तिकला आपल्या आईचं कारस्थान कळेल का? हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचे यापुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत.

टॅग्स :स्टार प्रवाह