Join us

क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:17 IST

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चा प्रीमियर २४ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या शोची चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगर सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस १९ मध्ये एन्ट्री करु शकते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या शोने बिग बॉसच्या नवीन सीझनसाठी अनाया बांगरशी संपर्क साधला आहे. बिग बॉस ताजा खबरच्या लेटेस्ट पोस्टनुसार, बिग बॉस १९ च्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत अनाया बांगरचे नाव देखील समोर येत आहे, परंतु शो आणि अनायाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

संजय बांगर यांची मुलगी अनया ही एक ट्रान्सजेंडर महिला आहे, ती एक खेळाडू आहे आणि ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील बनली आहे. अनायाचे पूर्वीचे नाव आर्यन बांगर होते, परंतु संजय बांगर यांच्या मुलाने लिंग बदलल्यानंतर त्याचे नाव आर्यन वरून अनाया केले. लिंग बदलण्यापूर्वी अनायाने अंडर-१६ क्रिकेट देखील खेळले आहे.

अनया सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे ४.२३ लाख फॉलोअर्स आहेत आणि आज ती एक मोठी चेहरा बनली आहे. अनायाच्या लोकप्रियतेमुळे तिला एका मोठ्या टीव्ही शो बिग बॉसच्या घरातून आमंत्रण मिळाले आहे. वृत्तानुसार, बिग बॉस १९ मध्ये अनायाची एन्ट्री जवळजवळ निश्चित आहे.

अनया बांगरवर झालीये शस्त्रक्रिया भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची ट्रान्सजेंडर मुलगी अनया बांगरने मुलापासून मुलगी होण्यासाठी अनेक वेदनादायक शस्त्रक्रिया केल्या आहेत. अनायाने तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे शस्त्रक्रियेदरम्यान येणाऱ्या समस्यांबद्दल सर्वांना सांगितले.

टॅग्स :बिग बॉस