मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनयाच्या दुनियेत तेजश्री एका नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. लवकरच ती एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. तिने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर ती 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सोडणार का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
तेजश्री नेहमीच स्वतःच्या कामाच्या जोरावर रसिकांची मनं जिंकत आली आहे. त्यामुळे तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, ही वेबसीरिज हिंदीत आहे की मराठीत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तेजश्री 'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' मध्ये स्वानंदी ही मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे आता तिच्या या नव्या वेबसीरिजच्या घोषणेनंतर चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, ती आपल्या या सुरू असलेल्या मालिकेचा निरोप घेणार की दोन्ही प्रोजेक्ट्समध्ये ती एकाच वेळी काम करेल? तेजश्री या प्रश्नाचे उत्तर कधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वर्कफ्रंटतेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत व्यग्र आहे. याआधी ती 'होणार सून मी या घरची', 'अग्गबाई सासूबाई' आणि 'प्रेमाची गोष्ट' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचली आहे. 'ती सध्या काय करते' आणि 'बबलू बॅचलर' यांसारख्या चित्रपट तसेच 'पॅडेड की पुशअप' या वेबसीरिजमध्येही तिने काम केले आहे. आता ती लवकरच एका नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Tejashree Pradhan announced a new web series, leading to speculation about her exit from the 'Veen Doghantali Hi Tutena' series. Fans are curious if she will leave the show or manage both projects simultaneously. The series' language remains undisclosed.
Web Summary : तेजश्री प्रधान ने एक नई वेब सीरीज की घोषणा की, जिससे 'वीण दोघांतली ही तुटेना' सीरीज छोड़ने की अटकलें लगाई जा रही हैं। प्रशंसक उत्सुक हैं कि क्या वह शो छोड़ देंगी या दोनों प्रोजेक्ट एक साथ संभालेंगी। सीरीज की भाषा अभी अज्ञात है।