सिझान छोट्या पडद्यावर परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 12:36 IST
कसोटी जिंदगी की या मालिकेतील अनुराग बासूची भूमिका साकारणारा सिझान खानच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. तो छोट्या पडद्यावर ...
सिझान छोट्या पडद्यावर परतणार
कसोटी जिंदगी की या मालिकेतील अनुराग बासूची भूमिका साकारणारा सिझान खानच्या चाहत्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. तो छोट्या पडद्यावर परत येणार असल्याची चर्चा आहे. सिझान गेल्या कित्येक वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. सिझान ये है मोहोब्बते या मालिकेत काम करणार होता. पण ऐनवेळी त्याने ही मालिका सोडली. पण आता गंगा या मालिकेत तो झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात सिझान एक महत्त्वाची भूमिका साकारणार असून तो एका व्यवसायिकाची भूमिका साकारणार आहे. सिझानच्या एंट्रीमुळे गंगाच्या आयुष्याला वेगवेगळी वळणे मिळणार असल्याची चर्चा आहे.