Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंचम मुरारीला त्‍यांच्‍या विवाहाचे गुपित समजण्‍यापासून थांबवू शकेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 12:14 IST

ईलायचीच्‍या फोनमध्‍ये विवाहाच्‍या शूटचे सर्व फोटो आहेत आणि आता तिचा फोन मुरारीकडे आहे.

ईलायची (हिबा नवाब) आणि पंचम (निखिल खुराणा) यांना सध्‍यातरी आराम मिळेल असे वाटत नाही. गुपचूप विवाह केलेले हे प्रेमीयुगुल पुन्‍हा एकदा संकटात सापडले आहे. मुरारी (अनुप उपाध्‍याय) त्‍यांचे गुपित जाणून घेण्‍याच्‍या अगदी समीप आले आहेत. छोट्या पडद्यावरील रोमँटिक विनोदी मालिकेने आपल्‍या रोचक पटकथा आणि विलक्षण ट्विस्‍ट्ससह रसिकांची मने जिंकली आहेत. मालिकेवर प्रेम व पाठिंब्‍याचा वर्षाव केलेल्‍या रसिकांनी आता 'जिजाजी छत पर हैं'च्‍या आगामी भागात नवीन वळण पाहायला मिळणार आहे.

ईलायची सुनिता आणि पिंटूप्रमाणे (हरवीर सिंग) पंचमसोबत विवाहाचे फोटोशूट करण्‍यासाठी उत्‍सुक आहे. ते ईलायचीच्‍या फोनमध्‍ये फोटो काढण्‍याचे ठरवतात. दुसरीकडे मुरारी आणि करूणा ईलायचीच्‍या विवाहासाठी प्रार्थना करण्‍याकरिता मंदिरामध्‍ये जातात. मंदिरामध्‍ये एक चोर मुरारीला धमकावत त्‍याचा फोन चोरून नेतो. मुरारी नवीन फोन विकत घेतो आणि तो फोन ईलायचीला देऊन तिचा जुना फोन स्‍वत:कडे ठेवायचे ठरवतो. ईलायची झोपलेली असताना मुरारी टेबलवर नवीन फोन ठेवतो आणि तिचा जुना फोन घेऊन जातो. फोनच्‍या या अदलाबदलीबाबत माहित नसलेला पंचम त्‍याची पत्‍नी ईलायचीला फोन करतो आणि म्‍हणतो 'आय लव्‍ह यू'. मुरारीला राग येतो.

पण पंचम या स्थितीमध्‍ये प्रसंगावधान राखत म्‍हणतो की, त्‍याने चुकून ईलायचीला फोन केला आहे, त्‍याला पिंटूला कॉल करायचा हवा होता. पंचमच्‍या प्रसंगावधानामुळे त्‍यांचे गुपित उघडकीस येण्‍यापासून वाचले असले तरी मोठी समस्‍या पुढे वाट पाहत आहे. ईलायचीच्‍या फोनमध्‍ये विवाहाच्‍या शूटचे सर्व फोटो आहेत आणि आता तिचा फोन मुरारीकडे आहे.

ईलायचीची भूमिका साकारणारी हिबा नवाब म्‍हणाली, ''आगामी एपिसोड्ससाठी शूटिंग करताना खूप मजा आली. मला पुन्‍हा वधूचा पोशाख परिधान करून फोटो काढण्‍याची संधी मिळाली. पटकथा खूपच रंजक आहे. पंचम आणि ईलायचीचे गुपित उघडकीस येण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आहे. मी रसिकांना आवाहन करते की, इलू व पंचमवर प्रेमाचा वर्षाव करत राहा आणि आगामी एपिसोड्स पाहण्‍याचा आनंद घ्‍या.''

पंचमची भूमिका साकारणारा निखिल खुराणा म्‍हणाला, ''पंचम पुन्‍हा एकदा संकटात सापडला आहे. तो मुरारीपासून त्‍यांच्‍या विवाहाचे गुपित लपवण्‍याचे मार्ग शोधत आहे. मी या एपिसोड्ससाठी शूटिंग करताना खूप धमाल केली. मी आमच्‍या प्रेक्षकांचे त्‍यांनी आमच्‍यावर केलेल्‍या प्रेम व पाठिंब्‍यासाठी आभार मानतो. हे खूपच आनंददायी आहे आणि मी माझे सर्वोत्‍तम देण्‍यासाठी अधिक मेहनत करू इच्छितो.''