Join us

'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये दीपिका आपल्या डावात यशस्वी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 07:15 IST

एका वर्षामध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या, राधा आणि प्रेमच लग्न, राधाच अचानक प्रेमच्या आयुष्यामधून निघून जाणं, राधाचं प्रेमा म्हणून मालिकेमध्ये येणं, दीपिका आणि देवयानीचा राधाला प्रेमच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न असो वा राधा – प्रेम विरोधात रचलेले कारस्थान असो.

ठळक मुद्दे दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा प्रयत्न केला होताप्रेम दीपिकाचा खरा चेहरा ओळखून राधाची मदत करेल ?

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. कलाकारांचा अभिनय, मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, राधाचं तिच्या माणसांवर आणि प्रेमवर असलेले निस्वार्थी प्रेम, तिने घरच्यांसाठी आणि प्रेमासाठी केलेला त्याग, देवयानी – दीपिकाची कारस्थानं सगळच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे आणि प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमामुळेच राधा प्रेम रंगी रंगली मालिकेला आता तब्बल एक वर्ष पूर्ण झालं आहे. मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेमध्ये राधाची भूमिका वीणा जगताप साकारत असून पहिल्याच मालिकेमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. या एका वर्षामध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या, राधा आणि प्रेमच लग्न, राधाच अचानक प्रेमच्या आयुष्यामधून निघून जाणं, राधाचं प्रेमा म्हणून मालिकेमध्ये येणं, दीपिका आणि देवयानीचा राधाला प्रेमच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न असो वा राधा – प्रेम विरोधात रचलेले कारस्थान असो.  आता मात्र मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. ज्यामध्ये राधाला एकट पाडण्याचा दीपिकाचा डाव आहे. यामध्ये दीपिका यशस्वी होईल का ? राधा याला कशी सामोरी जाईल ? दीपिकाचा हा डाव यशस्वी झाला तर दुरावलेली नाती राधा कशी जवळ करणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

याआधी दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा प्रयत्न केला होता. राधाने मोठ्या धीराने सहन केलं. प्रत्येक कठीण प्रसंगाला तिने मोठ्या हिमतीने समोर गेली. आता देखील दीपिका खोट्याचाच आधार घेऊन राधापासून प्रेमच नव्हे तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. घरच्यांचा देखील आता थोड्या फार प्रमाणात दीपिकावर विश्वास बसू लागला असून, ते राधाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, कि दीपिकाला खरोखरच पश्चाताप झाला असून ती सुधारली आहे. परंतु दीपिकाचा खरा चेहरा फक्त राधाला माहिती आहे ? आणि ती बदली नसून फक्त नाटक करत आहे हे देखील राधाला माहिती आहे.  इतकेच नसून दीपिकाने प्रेमला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे कि, राधाच्या ऑफिसमध्ये जाण्यानंतर व्यवसायामध्ये फक्त नुकसान झाले आहे तिने फक्त माणस जोडली पण व्यवसायामध्ये काहीच नफा झाला नाही. दीपिकाच्या प्रत्येक डावाला आणि कारस्थानाला उत्तर देणारी राधा या सकंटाला कशी सामोरी जाईल ? प्रेम दीपिकाचा खरा चेहरा ओळखून राधाची मदत करेल ? राधा दुरावलेली नाती कशी जवळ करणार ?

टॅग्स :राधा प्रेम रंगी रंगली