'या' कारणावरुन बिस बॉसच्या घरात आज सई आणि रेशममध्ये होणार वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 11:39 IST
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुध्दा रंगले “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य. या कार्यातील सुशांत आणि आस्ताद ...
'या' कारणावरुन बिस बॉसच्या घरात आज सई आणि रेशममध्ये होणार वाद
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुध्दा रंगले “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य. या कार्यातील सुशांत आणि आस्ताद मध्ये या आठवड्याच्या कॅप्टनसिसाठीची चुरस रंगणार आहे. आपल्या संस्कृती मध्ये श्री फळाचे खूपच महत्व आहे. म्हणूनच बिग बॉस “सत्कार मूर्ती” हे कॅप्टनसीचे कार्य घरातील सदस्यांवर आज सोपवणार आहेत. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण होईल बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन हे बघणे रंजक असणार आहे. काल रंगलेल्या टास्क मध्ये स्मिता आणि मेघाच्या जोडीला फ्रेश फेस हे टायटल मिळाले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “निरीक्षण परीक्षण हे कार्य. घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या बिग बॉसच्या घरातील प्रतिमेनुसार क्रमवारी ठरवायची आहे. सगळ्यांना विशेषणांचे फलक देण्यात येणार आहेत. त्यानुसार घरातील कुठल्या सदस्याला ते विशेषण शोभेल या निकषावर हे कार्य आधारित असेल. सदस्यांनी आपापसात चर्चा करून १ ते ५ अशी क्रमवारी ठरवायची आहे. ज्यामध्ये पहिले फलक होते “अति आत्मविश्वास” ... सईच्या मताप्रमाणे हे रेशम टिपणीसला शोभते. परंतु यावरूनच सई आणि रेशम मध्ये वाद होणार आहे. ज्यामध्ये सईच्या मताला खोडत रेशम मला असं वाटत नाही, आणि मी हे स्वीकारणार नाही असे म्हणार आहे. आता पुढे काय होणार ? कोणा मध्ये वाद होणार ? घरातील सदस्य कोणाला कोणते विशेषण देणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अजून एक कार्य रंगणार आहे “फॉग मस्त दिवस जबरदस्त”. घरामध्ये प्रसन्नता दरवळावी म्हणून सदस्यांना हे कार्य बिग बॉस सोपावणार आहेत. या कार्यासाठी सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात येईल. जी टीम सगळ्यात जास्त डिओ जमा करेल ती टीम या कार्यामध्ये विजयी ठरणार आहे. आज घराच्या कॅप्टनची निवड देखील करण्यात येणार आहे. सुशांत आणि आस्ताद मध्ये ही चुरस रंगणार आहे. तेव्हा बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण असेल ? कोण बाजी मारेल “फॉग मस्त दिवस जबरदस्त” या कार्यामध्ये ? तसेच “निरीक्षण परीक्षण” या कार्यामध्ये सदस्य कोणत्या सदस्याला कोणते विशेषण देणार ? हे बघणे रंजक असणार आहे.