Join us

अबोलीला वकील बनवण्याची अंकुशची इच्छा होणार का पूर्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 20:01 IST

Aboli : अबोली मालिकेत प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. अबोली आणि अंकुशसोबत चाळीतील सर्वांनीच पुढाकार घेऊन प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे या खास दिवशी अबोलीने वकील व्हावं ही इच्छा अंकुश बोलून दाखवणार आहे. इतकंच नाही तर त्याने अबोलीला स्वतःसोबत ध्वजारोहणाचा मानही दिला आहे. 

महिलांचा सन्मान आणि त्यांच्या पंखांना नवं बळ देण्याचा विचार स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकांमधून मांडला जातो. अबोली मालिकेतील हा प्रसंग तमाम महिलावर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल. एकीकडे नीताने न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केलं असताना तिच न्यायव्यवस्था कशी न्याय मिळवून देते, आणि न्यायव्यवस्था बळकट करण्यासाठी अबोली सारख्या वकीलांची समाजाला गरज असल्याचं महत्त्व अंकुश पटवून देणार आहे. 

अबोली मालिकेतील हा खास प्रसंग खरोखरच स्तुत्य आहे. अंकुशचं हे स्वप्न अबोली पूर्ण करणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. त्यासाठी अबोली रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहावे लागेल.