Join us
Daily Top 2Weekly Top 5

Wikipediaने ग्रॅण्ड फिनाले आधीच जाहीर केलं 'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव, वोटिंगआधीच ठरला का विजेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:18 IST

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' चा अंतिम सोहळा ७ डिसेंबर रोजी रंगणार आहे आणि त्याच दिवशी होस्ट सलमान खान या सीझनच्या विजेत्याची घोषणा करणार आहे. पण त्याआधीच विकिपीडियाने विजेत्याचे नाव जाहीर केले आहे.

'बिग बॉस १९' (Bigg Boss 19)चा अंतिम सोहळा ७ डिसेंबर रोजी रंगणार आहे आणि त्याच दिवशी होस्ट सलमान खान या सीझनच्या विजेत्याची घोषणा करणार आहे. बिग बॉसच्या घरात सध्या टॉप-५ स्पर्धक आहेत. यात  गौरव खन्ना, प्रणित मोरे, अमल मलिक, फरहाना भट आणि तान्या मित्तलचा समावेश आहे. फिनालेसाठीची वोटिंग सुरू आहे आणि लोक आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी उत्सुकतेने मतदान करत आहेत. याच दरम्यान विकिपीडियाने विजेत्याचे नाव देखील जाहीर केले. 

फिनालेची वोटिंग सुरू होण्यापूर्वीच विजेत्याचे नाव जाहीर झाले आहे, ज्यामुळे असा प्रश्न उपस्थित झाला आहे की मेकर्सने आधीच विजेता निश्चित केला आहे का? वोटिंग केवळ एक दिखावा आहे का? विकिपीडियाने गौरव खन्ना यांना 'बिग बॉस १९' चे विजेता म्हणून घोषित केले. लगेचच याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले, ज्यामध्ये गौरव खन्नाच्या नावापुढे टेंपलेट सी विनर असे लिहिलेले दिसत होते. मात्र, नंतर ते बदलण्यात आले आणि आता गौरवच्या नावापुढे फायनलिस्ट असे लिहिले आहे.

वोटिंग ट्रेंड्समध्ये प्रणित मोरे अव्वलबिग बॉस व्होट इन'नुसार, सध्या 'बिग बॉस १९' च्या वोटिंग ट्रेंड्समध्ये प्रणित मोरे पहिल्या स्थानावर आहेत आणि गौरव खन्ना दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सोशल मीडियावर विजेत्याबद्दल विविध तर्कवितर्क सुरू आहेत. काहींचा दावा आहे की, गौरव खन्नाच 'बिग बॉस १९'चे विजेते बनतील, तर काहींचा दावा आहे की निर्माते गौरवऐवजी प्रणित मोरेलाच विजेता बनवतील. दुसरीकडे, काहींनी फरहाना भट्टला विजेती म्हणून घोषित केले आहे.

विकिपीडियाबद्दल बोलायचं झाल्यास, त्यातली बहुतेक माहिती ही युजर्सने एडिट केलेली असते. म्हणजेच, कोणीही विकिपीडिया पेज एडिट करून त्यात आपल्या माहितीनुसार बदल करू शकतो. त्यामुळे, विकिपीडियाने जो विजेता सांगितला आहे, तो १००% अचूक मानला जाऊ शकत नाही. 

'बिग बॉस १९' मधील गौरव खन्नाचा प्रवासगौरव खन्नाबद्दल बोलायचे झाले तर, या सीझनमध्ये त्यांचा प्रवास अत्यंत सभ्य आणि शालीन राहिला आहे. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत गौरवने बिग बॉसच्या घरात कोणालाही शिवीगाळ केली नाही किंवा कोणाशीही गैरवर्तन केले नाही. गौरवने घरात आलेल्या माध्यमांनाही सांगितले होते की, जर तो विजेता झाला तर लोकांना कळेल की भांडण-तंट्याशिवायही 'बिग बॉस'सारखा शो जिंकता येतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wikipedia Leaks 'Bigg Boss 19' Winner Before Finale; Fixed Result?

Web Summary : Before the 'Bigg Boss 19' finale, Wikipedia seemingly revealed Gaurav Khanna as the winner, sparking controversy. Voting trends show Praneet More leading. Wikipedia's editable nature casts doubt on the accuracy of this claim.
टॅग्स :बिग बॉस १९