Join us

जीजू जेलमध्ये, बहीण चिंतेत; मग कुटुंबाला एकटं सोडून बिग बॉसमध्ये का आली शमिता शेट्टी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 10:58 IST

Bigg Boss OTT : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने बिग बॉस ओटीटीमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. साहजिकच एन्ट्री घेताच ती चर्चेत आली. सध्या शमिताचे कुटुंब अडचणीत आहे.

ठळक मुद्देशमिता शेट्टी दुस-यांदा बिग बॉसमध्ये आली आहे. याआधी बिग बॉसच्या तिस-या सीझनमध्ये स्पर्धक बनून ती आली होती. आता ती पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने (Shamita Shetty) बिग बॉस ओटीटीमध्ये (Bigg Boss OTT ) धमाकेदार एन्ट्री घेतली. साहजिकच एन्ट्री घेताच ती चर्चेत आली. सध्या शमिताचे कुटुंब अडचणीत आहे. एकीकडे तिचा जीजू  राज कुंद्रा ( Raj Kundra pornography case ) पोर्नोग्राफी प्रकरणात जेलमध्ये आहे. बहीण शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत शमिताने बिग बॉसच्या घरात येणे हा एक मोठा निर्णय आहे. इतक्या अडचणीच्या काळात शमिताने बिग बॉसची ऑफर  का स्वीकारली? असा प्रश्न पडणेही साहजिक आहे. बिग बॉसच्या मंचावर शमिताने खुद्द या प्रश्नाचे उत्तर दिले.

शमिता म्हणाली...काळ चांगला असो वा वाईट आपण श्वास घेणे सोडत नाही. मग आपण काम का सोडायचे? खरं सांगायचे  तर बिग बॉसची ऑफर मला फार आधीच आली होती आणि मी ही ऑफर स्वीकारली होती. मग खूप काही घडले. (तिचा इशारा राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाकडे होता.) पण मी कमिटमेंट केली होती आणि एक बार जो कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनती..., असे शमिता म्हणाली. 

शमिताला सेकंड चान्सशमिता शेट्टी दुस-यांदा बिग बॉसमध्ये आली आहे. याआधी बिग बॉसच्या तिस-या सीझनमध्ये स्पर्धक बनून ती आली होती. आता ती पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आहे.राज कुंद्राच्या अटकेनंतर   शिल्पा शेट्टीने एक स्टेटमेंट जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी या प्रकरणावर गप्प आहे आणि गप्पच राहणार आहे. पण कृपया आमच्या प्रायव्हसीर्चा आदर करा. एक आई या नात्याने माज्या मुलांची प्रायव्हर्जी जपा, अशी विनंती तिने या स्टेटमेंटमध्ये केली होती.काही दिवसांपूर्वी शमिताने बहीण शिल्पासाठी पोस्ट लिहिली होती.  हंगामा 2 या चित्रपटासाठी तिने शिल्पाला शुभेच्छा देत या कठीण काळात धीर ठेवण्याचा सल्ला दिला होता. ‘ हंगामा 2 साठी खूप साºया शुभेच्छा मुंकी... मला माहिती आहे या सिनेमासाठी तू खूप मेहनत घेतली होतीस. तुला खूप सारे प्रेम आणि मी तुज्यासोबत कायम आहे. तू आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेस. या सगळ्या अनुभवांमुळे तू खूप कणखर झाली आहेस. हा कठीण काळसुद्धा जाईल, विश्वास ठेव,’ असे शमिताने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्राबिग बॉस