खिलाडी अक्षय कुमारचा रुस्तम सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.या सिनेमाच्या प्रमोशनासाठी खिलाडीनं जोरदार तयारी केलीय. 1959च्या नानावटी प्रकरणावर आधारित या सिनेमाची कथा असून एका गंभीर विषयाला सिनेमात हात घालण्यात आलाय.. त्यामुळं या रुस्तमचं प्रमोशन योग्यरित्या व्हावं असा खिलाडी अक्षय कुमारचा आग्रह आहे. याच कारणामुळं अक्षयनं रुस्तमच्या प्रमोशनसाठी कॉमेडी नाईट्स बचाओ ऐवजी द कपिल शर्मा शोला पहिली पसंती दर्शवलीय.कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी नाईट्स बचाओ या शोमध्ये कॉमेडी करताना विनोदाचा अतिरेक झाल्याचं पाहायला मिळतं. कधी कधी तरी एखाद्या व्यक्तीचा अवमान होतो अशी भावना होत असल्याचंही काहींनी म्हटलंय. याउलट दुसरीकडे कपिल शर्माच्या शोमध्ये निव्वळ कॉमेडीवर भर दिला जातो. तसंच जो सिनेमा प्रमोशनसाठी येणार त्यानुसार शोचं स्क्रीप्टिंग केलं जातं. त्यामुळंच रुस्तम सिनेमाचा कथा आणि विषय पाहता अक्षयनं कृष्णाच्या शोला ठेंगा दाखवत कपिलच्या शोमध्येचं जाणं पसंत केलंय.
‘खिलाडी’नं कृष्णाच्या शोमध्ये जाण्यास का दिला नकार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 16:15 IST