Join us

मुग्धा वैशंपायनला २३व्या वर्षीच करायचंय लग्न, अखेर यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:50 IST

२३ व्या वर्षी लग्न का?, हा प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये मुग्धाला विचारण्यात येतोय.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधील लाडके मोदक आणि मॉनिटरने आपल्या प्रेमाची कबुली दिली. यानंतर सोशल मीडियावरुन दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. मुग्धा (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश (Prathamesh Laghate) दोघंही अप्रतिम गायक आहेतच पण त्यांचं आपापसातलं बॉंडिंगही छान आहे. अगदी आपल्याच घरातलं लग्नकार्य असल्यासारखं सर्व खूश झाले. आता दोघांच्या घरात लगीन घाईसुद्धा सुरु झालेत. मुग्धा वयाच्या २३ व्या लग्न का करतेय असा प्रश्न अनेकांना पडला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत तिने या प्रश्नांचे उत्तर दिलं आहे. 

मुग्धा आणि प्रथमेशने प्रेमाची कबुली दिली अन् सोशल मीडियावर प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. कसं जुळलं, लग्न कधी करणार, मुग्धा इतक्या लहान वयात का लग्न करतेय, एकमेकांमध्ये काय आवडलं असे प्रश्न येऊ लागले. या सर्व प्रश्नांनी उत्तरं दोघांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलासपणे उत्तर दिली.

२३ व्या वर्षी लग्न का?, हा प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये मुग्धाला विचारण्यात येतोय. याच उत्तर देतेना मुग्धा म्हणाली, आपली जी परंपरा आहे त्यामध्ये फार पूर्वीपासून मुलींची लग्न २२ किंवा २३ व्या वर्षी होत आलीत, आणि त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे. आणि त्या कारणांमुळे ती लग्न तशी होत आलीत. मला ती कारण पटतात. मुला-मुलीमध्ये ४ वर्षांचं अंतर असावं असं म्हणतात आणि यामागंच कारणही मला मान्य आहे. माझ्यात आणि प्रथमेशच्या वयात ४ ते ५ वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे मला असं वाटतं नाही की माझं लग्न लवकर होतंय.   

गेले तीन ते चार वर्षांपासून दोघंही डेट करत आहेत. तसंच प्रथमेशनेच मुग्धाला प्रपोज केल्याचं त्याने यावेळी सांगितलं. मुग्धा आणि प्रथमेश सध्या विविध गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. सध्या दोघांची केळवण ही सुरु आहेत.

टॅग्स :सा रे ग म पसेलिब्रिटी