का आठवतेय शालीन भानोतला त्याचे पहिले प्रेम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 15:48 IST
अभिनेता शालीन भानोत सध्या ऐतिहासिक नाट्य ‘शेर-ए- पंजाब महाराजा रणजित सिंग’मध्ये महाराजा रणजित सिंगचे वडिल महा सिंग यांची भूमिका ...
का आठवतेय शालीन भानोतला त्याचे पहिले प्रेम?
अभिनेता शालीन भानोत सध्या ऐतिहासिक नाट्य ‘शेर-ए- पंजाब महाराजा रणजित सिंग’मध्ये महाराजा रणजित सिंगचे वडिल महा सिंग यांची भूमिका साकारत आहे. आपल्या पत्नीपासून झालेल्या घटस्फोटाला त्याने अतिशय परिपक्वपणे स्वीकारले आहे आणि नुकतेच एक्स वाइफ दलजीत कौरसोबतच्या आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने आपले मत मांडले आहे.त्याची पूर्वपत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौरने त्याच्यावर काही वर्षांपूर्वी घरगुती हिंसेचे आरोप केले होते आणि त्यामुळे शालीन एक चर्चेचा विषय बनला होता. माझ्यात आणि दलजीतमध्ये आता सगळं काही ठीक आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि माझ्या आयुष्याचा हिस्सा बनल्याबद्दल मी नेहमीच तिचा आभारी राहिन. आम्ही काही खूप सुंदर क्षण एकत्र अनुभवले आहेत आणि आयुष्यभर पुरतील अशा सुंदर आठवणी निर्माण केल्या आहेत. हल्लीच तिला टि्वटरच्या माध्यमातून त्रास देणाऱ्या लोकांना मी चांगलेच समजावले. माझ्या परिवाराचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ती माझ्या परिवाराचा महत्त्वाचा भाग आहे आणि कायमच राहिल. तिच्याबद्दल माझ्या मनात वाईट कधीच नव्हते असेही शालिनने सांगितले. दलजीत कौर आणि शालीन भनोत ही छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध जोडी मानली जाते. त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप आवडली होती.त्या दोघांनी नच बलिये या कार्यक्रमातही भाग घेतला होता आणि याचे विजेतेपददेखील मिळवले होते. काही दिवसांनंतर शालीन छळ करत असल्याचा दलजीतने त्याच्यावर आरोप केला होता.शालीनने दलजीतकडे हुंड्याची मागणी केली असल्याचेही तिने म्हटले होते. यावरूनच या दोघांनी घटस्फोट घेतला होता. त्या दोघांना एक मुलगादेखील आहे.