Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेला का घ्यावा लागला इलेक्ट्रिक शॉक?, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:40 IST

अभिनेत्री केतकी चितळे बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

छोट्या पडद्यावरील मालिका तुझं माझं ब्रेकअपमधून अभिनेत्री केतकी चितळे घराघरात पोहचली. ही मालिका संपली असली तरी केतकी चितळे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे ती नेहमीच ट्रोल होताना दिसते. बऱ्याचदा तिचे विचार न करता बेधडक बोलण्याच्या सवयीमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र केतकी आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत ती इलेक्ट्रिक शॉक घेत असल्याचे दिसते आहे.  

केतकी चितळे गेल्या काही वर्षापासून मानसिक आजाराचा सामना करते आहे. ती स्वत:ला मानसिक आजारातून बाहेर करण्यासाठी वेगवेगळ्या मेडिकल उपचार घेते आहे. या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ ती स्वत: शेअर करताना दिसते. पण नुकतच तिने शेअर केलेल्या व्हिडिओत ती इलेक्ट्रीक शॉक घेत असल्याचे दिसून आले.

इलेक्ट्रीक शॉक घेतानाचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिची ही अवस्था पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. इलेक्ट्रीक शॉक घेण्याआधी आणि घेतल्या नंतरची सर्व परिस्थितीने या व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.

याआधी एका शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत क्षुल्लक कारणावरुन भांडण करतानाचा व्हिडिओ देखील तिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते.

अभिनेत्री केतकी चितळे ही मराठी मालिकविश्वातील एक नावाजलेली अभिनेत्री आहे . लक्ष्मी सदैव मंगलम ह्या मालिकेतील तिची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती.

 

टॅग्स :केतकी चितळे