Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्चना पूरण सिंगच्या या फोटोंवर युजर्स म्हणतात........

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 11:58 IST

अर्चनाचा बिनधास्त आणि तिकाच मजेशीर अंदाज रसिकांना खूप पसंत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. म्हणूनच तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते.

अर्चना पूरण सिंग बॉलिवूड इंडस्ट्रीतील चर्चित व्यक्तीमत्त्व आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय मालिकेतही काम केलं आहे. सध्या कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पहायला मिळते आहे. अर्चनाने १९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'निकाह' सिनेमातून करियरला सुरूवात केली होती. त्यानंतर अर्चनाने कित्येक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं. तिचे ग्लॅमरस अंदाजातले फोटो सध्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळते आहे. या फोटोंमधील अर्चनाचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. 

अर्चनाचा बिनधास्त आणि तिकाच मजेशीर अंदाज रसिकांना खूप पसंत असल्याचे वारंवार पाहायला मिळते. म्हणूनच तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. तिचे हे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणेही कठिण आहे. वयाची 57 वर्ष पूर्ण केलेल्या अर्चना आजही पूर्वीप्रमाणेच सुंदर आणि तितकीच फिट दिसते.  विशेष म्हणजे या वयातही तिचं सौंदर्यं पहिल्यापेक्षा अधिक घायाळ करणार असल्याचे पाहायला मिळते.  

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली अर्चना तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय वय वाढत असलं तरी आपल्या फिटनेसमुळे आजच्या अनेक अभिनेत्रींना ती कडवी टक्कर देते. इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली असता आपल्याला कळून येईल की अर्चना तिच्या फिटनेसबाबत किती जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय तिचे सौंदर्य आजही अबाधित आहे.

टॅग्स :अर्चना पूरण सिंगकपिल शर्मा