Join us
Daily Top 2Weekly Top 5

शफाकला कोणाच्या पैंजणाचा आवाज आला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 18:13 IST

शफाक नाझ सध्या चिडियाघर या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हवेलीमध्ये गेली ...

शफाक नाझ सध्या चिडियाघर या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी ती काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका हवेलीमध्ये गेली होती. ही हवेली खूपच भयावह होती. या हवेलीत शफाकने काही वर्षांपूर्वी संस्कार लक्ष्मी या मालिकेचे चित्रीकरण केले होते. त्याचवेळी या हवेलीत काही तरी वेगळेच घडत असल्याचे तिला जाणवले होते. चिडियाघर या मालिकेचे चित्रीकरण करत असताना चित्रीकरणाच्या दरम्यान वेळ असल्याने शफाक आणि तिची सहकलाकार त्रिशिका हवेलीत फेरफटका मारायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना अचानक पैंजणाचा आवाज आला. हा आवाज ऐकताच त्या दोघीही प्रचंड घाबरल्या. दुर्लक्ष करण्यासाठी त्या दोघीही मोठ्यामोठ्याने गाऊ लागल्या आणि धावतच चित्रीकरणाच्या स्थळी परत आल्या. तिथे आल्यावर त्यांनी चौकशी केली असता त्यांना कळले की, या हवेलीत पूर्वी अनेक हत्या झालेल्या असल्याने ही हवेली झपाटलेली आहे असेच मानले जाते. हे सगळे ऐकताच त्या दोघीही अजूनच घाबरल्या.