शानची जागा कोण घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 13:00 IST
द व्हॉईस इंडिया किडस या कार्यक्रमातील चिमुकले स्पर्धक त्यांच्या गायनाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. प्रेक्षक त्यांच्या आवाजवर अक्षरशः ...
शानची जागा कोण घेणार?
द व्हॉईस इंडिया किडस या कार्यक्रमातील चिमुकले स्पर्धक त्यांच्या गायनाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. प्रेक्षक त्यांच्या आवाजवर अक्षरशः फिदा झाले आहेत. या कार्यक्रमात गायक शान, शेखर आणि नीती मोहन मेन्टॉरची भूमिका साकारत आहेत. पण आता शानने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शानची जागा कोण घेऊ शकेल याचा सध्या प्रोडक्शन हाऊस विचार करत आहे. या कार्यक्रमात शानची जागा विशाल दादलानी घेणार असल्याची चर्चा आहे.