Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे ती तिला सारे समजतात कपिलची गर्लफ्रेंड ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 12:26 IST

कॉमेडी किंग कपिल शर्माचं नाव कायम एका मुलीशी जोडलं गेलंय, आता यांत कितपत तथ्य आहे हे कुणालाही माहित नाही. ...

कॉमेडी किंग कपिल शर्माचं नाव कायम एका मुलीशी जोडलं गेलंय, आता यांत कितपत तथ्य आहे हे कुणालाही माहित नाही. मात्र आम्ही तुम्हाला सांगतोय की कोण आहे ती कपिलची गर्लफ्रेंड ? त्याची ही गर्लफ्रेंड म्हणजे प्रिती सिमोंस. ही प्रिती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कपिलच्या शोची क्रिएटिव्ह दिग्दर्शिका होती. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रिती गेल्या अनेक वर्षापासून काम करतेय. कपिल आणि ती कॉमेडी सर्कस या शोच्या वेळी एकमेकांच्या जवळ आले.काही दिवस एकत्र काम केल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हीच मैत्री आणखी बहरत गेली. कॉमेडी नाईट विथ कपिल शोला मिळालेल्या यशात जितका कपिलचा वाटा आहे तितकाच प्रितीचाही आहे. ज्यावेळी कपिल आणि कलर्स वाहिनीमध्ये वाद झाला त्यावेळी सुद्धा प्रिती कपिलच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.या सगळ्यांगोष्टींमुळे कपिल शर्मा आता लवकरच प्रितीशी लग्न करणार आहे.त्यामुळे कपिलच्या सगळ्या फॅन्सचा हिरमोड होणार हे मात्र नक्की.