Join us

सिया के ‘राम’ला कुणी पाठवलं रक्ताचं शुभेच्छा कार्ड ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 12:01 IST

'सिया के राम' या मालिकेत राम ही भूमिका साकारणा-या अभिनेता आशीष शर्माचे बरेच फॅन आहेत. नुकताच आशीषनं त्याचा वाढदिवस ...

'सिया के राम' या मालिकेत राम ही भूमिका साकारणा-या अभिनेता आशीष शर्माचे बरेच फॅन आहेत. नुकताच आशीषनं त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्याला फॅन्स आणि मित्रांकडून बरीच गिफ्ट्ससुद्धा मिळाले. मात्र एका फॅनचं गिफ्ट पाहून त्याला आनंद नाही तर धक्का बसला. कारण रक्ताने हॅपी बर्थडे लिहिलेले शुभेच्छा कार्ड त्याला गिफ्ट म्हणून मिळालं. त्याची फॅन असलेल्या एका युवतीने त्याला या शुभेच्छा पाठवल्या होत्या. मात्र हे गिफ्ट पाहून आशिषला आनंद नाही तर धक्का बसला. कारण आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही योग्य पद्धत नसल्याचं आशिषला वाटतं. अशाप्रकारच्या गोष्टींना आपण कधीच मान्य करणार नाही असंही त्यानं स्पष्ट केलंय. रसिकांचे प्रेम आहे हे मान्य असलं तरी साध्या पेननं लिहिलेल्या शुभेच्छासुद्धा आपल्यासाठी खूप मौल्यवान असल्याचं आशीषनं सांगितलं.