Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान कोणाला शोधतोय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 14:37 IST

बिग बॉस 10 या कार्यक्रमाचा पहिला प्रोमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये सलमान अंतराऴवीरच्या भूमिकेत झळकला होता. आता ...

बिग बॉस 10 या कार्यक्रमाचा पहिला प्रोमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये सलमान अंतराऴवीरच्या भूमिकेत झळकला होता. आता दुसऱ्या प्रोमोमध्ये सलमान काऊबॉय लूकमध्ये दिसणार असून त्याच्या हातात एक मशालदेखील असणार आहे. त्याचा हा लूक खूपच स्टायलिश आहे. ही मशाल हातात घेऊन सलमान नृत्यदेखील करणार आहे. ही मशाल पाहून सलमान कोणाचा शोध घेतोय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येऊन बिग बॉसच्या घरात धमाल मस्ती करणार आहेत. तसेच यंदाच्या पर्वात सामान्य लोकही बिग बॉसच्या घरात हजेरी लावणार असल्याचे या प्रोमोतून सुचवण्यात आले आहे.