Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरा आदित्य देसाई कोण? 'माझा होशिल ना' मालिकेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 14:32 IST

आदित्यला सर्व सत्य कळेल का? आणि त्याला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत बसवण्यात मामा यशस्वी होतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. भावी काळात आदित्य विरुद्ध आदित्य असा सामना रंगू लागेल अशी चिन्हं आहेत.

 'माझा होशिल ना' ही लोकप्रिय मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. अल्पावधीतच मालिकेने रसिकांची प्रचंड पसंती मिळवली आहे.  या मालिकेतील सगळ्याच भूमिका रसिकांच्या आवडत्या बनल्या आहेत. सई आणि आदित्य दोघांनाही रसिकांची विशेष पसंती मिळते. सध्या या मालिकेतील सर्वांचे लाडके सई आणि आदित्य यांच्या आयुष्यातील कठीण काळ सुरू आहे.

प्रेक्षकांनी गेल्या काही भागात पाहिलं की जेडीने आदित्यवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यातून आदित्य जरी सुखरूप बचावला असला तरी आदित्यला आता त्याच्या भूतकाळाबद्दल आणि खऱ्या ओळखीबद्दल सांगायला हवं असं सगळ्या मामांना पटलंय आणि आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत आदित्यला बसवण्यासाठी ब्रह्मेंनी एक प्रेस कॉन्फरन्स भरवली आहे, ज्यात आदित्य देसाईची साऱ्यांशी ओळख करून देणं हा त्यांचा हेतू आहे. मात्र सई आदित्यला या बद्दल काहीच कल्पना नाहिये आणि आयत्या वेळेस काहितरी घोळ होऊ शकतो ही भिती मनात घोळतेय.

त्यातच या प्रेस कॉन्फरन्समध्ये नवाच आदित्य देसाई अवतरतो आणि कंपनीवर हक्क सांगू लागतो. याने गोंधळात अजूनच भर पडते. नवा पेच तयार होतो. ज्यातून सुटणं कठीण आहे. आता या दोन आदित्य देसाई मधला खरा आदित्य देसाई कोण आणि हा तोतया नक्की कसा आलाय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

आदित्यला सर्व सत्य कळेल का? आणि त्याला आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजच्या मालकाच्या खुर्चीत बसवण्यात मामा यशस्वी होतील का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. भावी काळात आदित्य विरुद्ध आदित्य असा सामना रंगू लागेल अशी चिन्हं आहेत.