Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मध्ये दीपाच्या संसारात ढवळाढवळ करणारी आयेशा आहे तरी कोण?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 16:21 IST

रंग माझा वेगळा मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कार्तिक आणि दीपाचे एकीकडे घटस्फोट होतो आहे तर दुसरीकडे घटस्फोट होण्याआधीच कार्तिक कुणाच्याही परवानगीशिवाय आयेशाशी लग्न करायचे ठरवतो. मात्र सौंदर्याला आधीच समजल्यामुळे तिकडे सौंदर्या, ललित आणि दीपा मंदिरात लग्न थांबवण्यासाठी पोहचतात. तुम्हाला माहित आहे का, आयेशा हे पात्र साकारणारी अभिनेत्री नक्की कोण आहे? आयेशाची भूमिका विदिशा म्हसकर हिने केली आहे. 

अभिनेत्री विदिशा म्हसकर ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अभिनय कारकीर्दीची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली आहे. तिने हे मन बावरे या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. हे मन बावरे मालिकेत तिने सान्वीची भूमिका केली होती. या भूमिकेला खूप लोकप्रियता मिळाली आहे.

याशिवाय विदिशा म्हसकर अनेक मराठी मालिकांमध्ये दिसली. ती फुलराणी, बन मस्का यांसारख्या मालिकांमध्ये पहायला मिळाली आहे. या मालिकेतील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.

दहा बाय दहा या नाटकात तिने अभिनय केला. यामध्ये तिचा अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अभिनय होता. तसेच प्रथमेश परब आणि सुप्रिया पाठारे यांच्यादेखील भूमिका होत्या. झी मराठीचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेसचा पुरस्कार तिला मिळाला आहे.

विदीशा म्हसकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

सोशल मीडियावर ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

टॅग्स :स्टार प्रवाह