Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या प्रश्नावर माॅनीचा पारा चढला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 14:55 IST

'नागिन'चा पहिला सीझन  मॉनी रॉयने गाजवल्यानंतर आता ती 'नागिन सीझन 2'च्या शूटिंगमध्ये बिझी झालीय. मॉनीची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार ...

'नागिन'चा पहिला सीझन  मॉनी रॉयने गाजवल्यानंतर आता ती 'नागिन सीझन 2'च्या शूटिंगमध्ये बिझी झालीय. मॉनीची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार नागिन 2 च्या सेटवर पोहचला. पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर मॉनी चांगलीच संतापली. तिचा पारा इतका काही चढला की पुढे काहीच बोलण्याची तिची इच्छा नव्हती. नागिन-2 साठी  मॉनीने ओठांची सर्जरी केली आहे का असा तो प्रश्न त्या पत्रकाराने विचारला होता. मात्र मॅडम मॉनी अशी काही संतापली की तिने तिथेच त्या पत्रकाराला सुनावले. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोचे निरीक्षण करुन मगच प्रश्न विचारण्याचा सज्जड दमच मॉनीने त्या पत्रकाराला भरला. मॉनीच्या उत्तरात काहीच उलगडा झालेला नाही. एक मात्र खरंय की ''दिमाग शांत रहे तो सब चीजें आसान हो जाती है''असाच काहीसा सल्ला मॉनीला देऊ शकतो.