Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बिग बॉस मराठीच्या घरात कोणत्या जोडीला मिळेल फ्रेश फेस हे टायटल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 12:10 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुद्धा “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य रंगले. या कार्यामध्ये काल पुष्कर, सई, ...

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालसुद्धा “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य रंगले. या कार्यामध्ये काल पुष्कर, सई, भूषण, शर्मिष्ठा, आऊ यांची अंडी फोडण्यात आली. सई काल बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांवर नाराज दिसली तसेच तिला खूप वाईट वाटले जेव्हा आस्ताद आणि सुशांत यांनी तिच्या नावाचे अंड सुरक्षित करण्यासाठी समर्थक बनण्यास नकार दिला. तसेच काल देखील “अंडे का फंडा” या कार्यादरम्यान काही सदस्यांकडून हिंसा आणि शक्ती प्रदर्शन झालेच. आता या सगळ्यावर बिग बॉसची काय प्रतिक्रिया असेल? सईने बिग बॉससमोर आपल्या कोणत्या भावना व्यक्त केल्या? सुशांत आणि पुष्करमध्ये वाद का झाला? हे बघणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस घरातील सदस्यांना एक कार्य देणार आहेत. या कार्यामध्ये बिग बॉस घरातील महिला सदस्यांना आनंदित व्हायची संधी देणार आहेत. एव्हरयुथ आजच्या कार्याचे प्रायोजक असल्याने या कार्याअंतर्गत एका जोडीला फ्रेश फेस हे टायटल मिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे. या कार्यामध्ये सदस्यांची तीन जोड्यांमध्ये विभागणी करण्यात येईल. ही म्हणजे एक स्पर्धा असणार आहे. जी जोडी सगळ्यात कमी वेळामध्ये हे कार्य पूर्ण करेल ती या कार्यामध्ये विजयी ठरेल. तेव्हा हे कार्य नेमके कसे रंगणार? कोणत्या जोडीला फ्रेश फेस हे टायटल मिळणार? कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच बिग बॉसच्या घरात मिळणार आहेत. बिग बॉस हा कार्यक्रम हिंदीत चांगलाच गाजला. या कार्यक्रमाच्या अधिकाधिक सिझनचे सूत्रसंचालन सलमान खानने केले असून सलमानशिवाय या कार्यक्रमाचा विचार देखील प्रेक्षक करू शकत नाही. या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे हा कार्यक्रम दाक्षिणात्य भाषांमध्ये, बंगाली भाषेमध्ये सुरू करण्यात आला. आता हा कार्यक्रम मराठीत सुरू झाला असून खूपच कमी दिवसांत या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. Also Read :  रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...