Join us
Daily Top 2Weekly Top 5

​संस्कारी बाबूजींचे कोणते रूप आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 10:19 IST

आलोकनाथ यांनी काही वर्षांपूर्वी सपना बाबूल का...बिदाई या मालिकेत काम केले होते. आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका मालिकेत ...

आलोकनाथ यांनी काही वर्षांपूर्वी सपना बाबूल का...बिदाई या मालिकेत काम केले होते. आता ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका मालिकेत पाहायला मिळणार आहे. नामकरण या मालिकेत त्यांची लवकरच एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. नामकरण या मालिकेची कथा महेश भट्ट यांनी लिहिली असून या मालिकेत बरखा बिष्ट, रिमा लागू, विराफ पटेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत आलोक नाथ काहीच भागांसाठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पण त्यांच्या एंट्रीनंतर कथानकाला एक वेगळे वळण मिळणार अाहे. आलोक नाथ यांनी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील त्यांची भूमिका खूप वेगळी असणार असल्याचे म्हटले जात आहे. आलोकनाथ यांनी मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटात आदर्श वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या या आदर्श वडिलांच्या भूमिकेवरून अनेक जोक्स सोशल मीडिया साईटवरही फिरत होते. या जोक्समुळे ट्विटरच्या ट्रेंडिंगमध्येही आलोकनाथ आले होते. आलोक नाथ यांना त्यांच्या कारकिर्दीत जितकी प्रसिद्धी मिळाली नाही, तितकी प्रसिद्धी त्यांना या जोक्सनी मिळवून दिली होती. या जोक्समुळे त्यांना आदर्श बाबूजी हे नावच पडले आहे. पण खऱ्या आयुष्यात त्यांची इमेज ही यापेक्षा खूपच वेगळी आहे.