Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पहरेदार पिया की मालिका' बंद झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात एंट्री घेणार का तेजस्वी वायंगणकर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 16:43 IST

अनेक कारणांमुळे पहरेदार पिया की मालिका नेहमीच चर्चेत राहिली. सुरुवातीपासून कॉन्ट्रोव्हर्सिमध्ये राहिलेली सोनी टीव्हीवरील ही मालिका अखेर बंद करण्यात ...

अनेक कारणांमुळे पहरेदार पिया की मालिका नेहमीच चर्चेत राहिली. सुरुवातीपासून कॉन्ट्रोव्हर्सिमध्ये राहिलेली सोनी टीव्हीवरील ही मालिका अखेर बंद करण्यात आली. या मालिकेमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर चांगलीच चर्चेत आली. सूत्रांकडून आता असे कळते आहे की कॉन्ट्रोव्हर्सी आणि एंटरटेनमेंटने भरलेल्या शो अर्थात सलमान खानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून अप्रोच करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी पहरेदार पिया की मालिका बंद झाल्यामुळे बिग बॉस या रिअॅलिटी शोचा भाग बनू शकते.    सूत्रांच्या माहितीनुसार तेजस्वी वायंगणकरला बिग बॉसच्या 11 व्या सीजनचा भाग बनण्यासाठी अप्रोच करण्यात आले आहे. या रिअॅलिटी शोच्या मेकर्सची इच्छा आहे की तेजस्वीने या शोमध्ये सहभागी व्हावे. यासंदर्भात तेजस्वी म्हणाली की होय, ''मला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अप्रोच करण्यात आला आहे. सध्या मी या शोमध्ये सहभागी होण्यासंदर्भात काहीच सांगू शकत नाही. कारण सोनी टीव्हीवर एका मालिकासाठी काम सुरू आहे. त्यामुळे मी बिग बॉस 11 चा हिस्सा बनू शकेन असे मला वाटतात नाही.'' बिग बॉसच्या मेकर्सचा पूर्ण प्रयत्न आहे की तेजस्वीला याशोमध्ये घेऊन येण्याचा. तेजस्वीची मालिका नेहमीच वादात राहिली ती जर या शोचा हिस्सा बनली जर शो नक्कीच हिट होईल असे मेकर्सना वाटेय. आतपर्यंत नेहमीच वादात राहिलेल्या व्यक्तींना बिग बॉसच्या घरात निमंत्रित केले जाते. तेजस्वीच्या ''पहरेदार पिया की'' या मालिकेत  नऊ वर्षांचा रतन हर्षवर्धन सिंह म्हणजेच अफान खान आणि 18 वर्षांची मुलगी दिया म्हणजेच तेजस्वी वायंगणकर यांच्या असामान्य विवाहाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.