जेव्हा ‘बिग बॉस’च्या दोन कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन एकत्र येतात..., पहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 21:06 IST
बिग बॉस या वादग्रस्त शोमध्ये झळकलेल्या अर्शी खान आणि राखी सावंत या चक्क एकत्र डान्स करताना बघावयास मिळाल्या, सध्या त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जेव्हा ‘बिग बॉस’च्या दोन कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन एकत्र येतात..., पहा व्हिडीओ!
बिग बॉस या सर्वाधिक वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या एक्स स्पर्धक अर्शी खान आणि राखी सावंत नुकत्याच एकत्र बघावयास मिळाल्या. वादग्रस्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाºया या दोघींनी एकत्र टाइम स्पेंड करताना त्यांनी त्यांचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. तसेच एक व्हिडीओही पोस्ट केला असून, त्यामध्ये दोन्ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन डान्स करताना बघावयास मिळत आहे. वास्तविक राखी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करीत असते. परंतु तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच गाजत असून, दोघी एकत्र आल्याबद्दल यूजर्समध्ये आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. राखी आणि अर्शी अजय देवगणच्या ‘बादशाहो’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघीही पाउट बनविताना पोज देत आहेत. राखीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, अर्शी खान माझी स्वीटहार्ट फ्रेंड आहे. माझी best baddy आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर यूजर्सनी कॉमेण्ट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला. काहींनी नेहमीप्रमाणे राखीची खिल्लीही उडविली. एका यूजरने लिहिले की, baddy नाही buddy असते. आणखी एका यूजरने लिहिले, ‘दोघीही baddyz’ तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘राखी तू नेहमीच असे का करीत असते?’ दरम्यान, राखी आणि अर्शीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात आहे.