Join us

"अडचणींनी डोकं वर काढलं की...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं वडिलांच्या आठवणीत शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2023 10:38 IST

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर वडीलांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील सर्वच पात्रांना रसिकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने साकारली आहे. अश्विनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने इंस्टाग्राम स्टोरीवर वडीलांच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्राम स्टोरीवर वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, अडचणींनी डोकं वर काढलं की सगळ्यात जवळच्या माणसाची जास्तच आठवण येते.. तिने नाना, प्रेम आणि आठवण असं हॅशटॅगमध्ये लिहिले आहे. अश्विनी बऱ्याचदा वडिलांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. 

अश्विनीच्या वडिलांचे १८ मे २०२१ रोजी निधन झाले. अभिनेत्रीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांना कोरोनाची लागण झालेली, त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ५६ वर्षांचे होते.

वर्कफ्रंट...अश्विनी महांगडे हे टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय नाव आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणू अक्काच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. नाटकांपासून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या अश्विनीने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. ती 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.  

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिका