Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्वेता तिवारीचे लग्न झाल्यानंतरही ती होती 'कसोटी जिंदगी की'मधील या सहकलाकारासोबत नात्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:57 IST

श्वेता तिवारीने अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच तिचे राजा चौधरीसोबत लग्न झाले होते. पण तरीही ती कसौटी जिंदगी की या मालिकेत तिच्या सहकलाकारासोबत नात्यात होती.

ठळक मुद्देसीझानने मुलाखतीत सांगितले होते की, श्वेता तिवारी ही माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक होती याच्याशिवाय मी अधिक काहीही सांगणार नाही. आता माझा तिच्यासोबत काहीही संबंध नाहीये.

कसौटी जिंदगी की ही मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा आणि अनुरागची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेत श्वेता तिवारी प्रेरणाच्या तर सीझान खान अनुरागच्या भूमिकेत दिसले होते. या मालिकेत श्वेता आणि सीझानची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आज या मालिकेला अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.

गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत आहे. श्वेताने पती अभिनव कोहली विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर अभिनवला अटक करून सोडून देण्यात आले होते. तर अभिनवच्या आईने त्याच्यावर लावलेले सगळे आरोप खोटे असल्याचे सांगत ती ही सगळं अभिनवपासून सुटका मिळवण्यासाठी करत असल्याचे सांगितले होते.  

श्वेताचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. राजा बिग बॉस या कार्यक्रमात झळकला होता. राजावर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावत श्वेताने त्याला घटस्फोट दिला होता. श्वेताने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वीच तिचे राजासोबत लग्न झालेले होते. पण तरीही तिचे सीझानसोबत अफेअर होते. मात्र त्यांचे ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघे एकमेकांचे तोंडही पाहाणे पसंत करत नव्हते. चित्रीकरणाच्यावेळी देखील ते एकमेकांशी बोलत नसत. सीझाननेच त्यांच्या अफेअरची कबुली 2005 ला दिलेल्या एका मुलाखतीत दिली होती.

सीझानने 2005 ला इंडिया फॉरमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, हा माझा भूतकाळ असून त्याच्यातून आता मी बाहेर पडलो आहे. माझ्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत अनेक घडामोडी घडल्या. श्वेता तिवारी ही माझ्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची चूक होती याच्याशिवाय मी अधिक काहीही सांगणार नाही. आता माझा तिच्यासोबत काहीही संबंध नाहीये. ती माझ्यासाठी कोणीही नाहीये. तिच्याशी संबंधीत असलेल्या लोकांपासून देखील मी दूर राहाण्याचे ठरवले आहे. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2श्वेता तिवारी