Join us

Positive Imapct : या मालिकेमुळे ठरलं सावळ्या रंगाच्या मुलाचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 14:01 IST

सिनेमा किंवा मालिका हे समाज मनाचे प्रतिबिंब असतात.

असे म्हणातात की सिनेमा किंवा मालिका हे समाज मनाचे प्रतिबिंब असतात. एखादी मालिका किंवा सिनेमा बघून अनेकवेळा रसिक प्रेरणा घेतात. असाचे एक उदारहण समोर आले आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या वर्णभेदावर भाष्य करणारी मालिका पाहून एका युवतीने सावळ्या रंगाच्या मुलाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळमधल्या  राणी भुतेने सावळ्या मुलाशी विवाह करण्याचा निर्णय घेतलाय. व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनीअर असणारी 27 वर्षांची राणी रंग माझा वेगळा मालिकेची चाहती आहे. वर्ण भेदावर भाष्य करणारा मालिकेचा विषय आणि दिला जाणारा संदेश राणीला मनापासून पटल्यामुळेच तिने अनुराग मिसाळ यांच्याशी लग्न करण्याचं ठरवलं आणि तिला या निर्णयात कुटुंबाचीही साथ मिळाली असे तिने सांगितले.

   या अनोख्या अनुभवाविषयी सांगताना आशुतोष गोखले म्हणाला, जो विषय पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे. मालिकेमुळे मतपरिवर्तन होत असेल तर ही खूप महत्त्वाची बाब आहे. या प्रसंगामुळे आम्ही सर्वच खूप भारावून गेलोय.  

स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच १०० भागांचा टप्पा पार केला आहे. मालिकेला  100 भाग पूर्ण झाले या निमित्ताने या जोडप्याला सेटवर बोलवण्यात आलं होतं. रंग माझा वेगळाच्या संपूर्ण टीमने त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :स्टार प्रवाह